परिचय
महिलांवर होणारे शारिरिक व मानसिक अत्यचार, आर्थिक छळवणुक समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना, अशा संकटांसाठी त्या महिलेस व तिच्या कुटुंबियास न्याय मिळण्यासाठी तथा वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार व मदत एकाच छताखाली मिळण्यासाठी योजना
लाभार्थी
हिंसाचारामुळे पीडित आणि संकटात असलेल्या महिला , गरजू स्त्रिया ज्यांच्यासह हिंसाचाराने प्रभावित त्यांच्या मुलांसह (सर्व वयोगटातील मुली आणि 12 वर्षांपर्यंतची मुले) जास्तीत जास्त 5 दिवसांच्या कालावधीसाठी OSC मध्ये तात्पुरता निवारा घेऊ शकतात.
उद्धेश
पीडित गरजू महिला आणि हिंसाचाराने प्रभावित झालेल्यांना त्यांच्या मुलांसह (सर्व वयोगटातील मुली आणि 12 वर्षांपर्यंतची मुले) मदत आणि आधार प्रदान करणे जसेकी वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलीस सहाय्यक, मानसोपचार, कायदेशीर सुविधा, तात्पुरता निवारा ,अन्न ईत्यादी .
योजना तपशील
- महिलांवर होणारे शारिरिक व मानसिक अत्यचार, आर्थिक छळवणुक समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना, अशा संकटांसाठी त्या महिलेस व तिच्या कुटुंबियास न्याय मिळण्यासाठी तथा वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार व मदत एकाच छताखाली मिळण्यासाठी योजना
- सद्यस्थितीत राज्यात एकुण 36 जिल्हयामध्ये 37 केंद्र कार्यरत आहेत.
- महिलेस वैद्यकिय उपचार, समुपदेशन, पोलीस सहाय्य, मानसोपचार, विधी सहाय्य, अल्प कालावधीसाठी निवारा व अन्न इ. सुविधा पुरविण्याची तरतूद