लाभार्थी
6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बाल, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता
योजनेची उद्दीष्टे
बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्युचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
राज्यातील 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व तीव्र कमी वजनाची बालके यांना THR ऐवजी कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा कन्झ्युमर्स फेडरेशन मार्फत केला जातो. त्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.
6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी पाककृती:-
अ.क्र.
|
धान्य
|
प्रति लाभार्थी प्रतिदिन द्यावयाच्या धान्याचा प्रकार
|
50 दिवसांसाठी (2महिने) पॅकींग साईज
|
1
|
गहू
|
66 ग्रॅम
|
3.300 कि.ग्रॅम
|
2
|
मसुरडाळ
|
38 ग्रॅम
|
1.900 कि.ग्रॅम
|
3
|
मिरची
|
4 ग्रॅम
|
0.200 कि.ग्रॅम
|
4
|
हळद
|
4 ग्रॅम
|
2.200 कि.ग्रॅम
|
5
|
मीठ
|
8 ग्रॅम
|
0.400 कि.ग्रॅम
|
6
|
सोयाबीनतेल
|
10 ग्रॅम
|
0.500 कि.ग्रॅम
|
7
|
चवळी
|
40 ग्रॅम
|
2.000 कि.ग्रॅम
|
|
एकूण
|
170 ग्रॅम
|
8.500 कि.ग्रॅम
|
योजनेचे स्वरुप
6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील सर्वसाधारण व मध्यम श्रेणीतील बालकांना 500 उष्मांक व 12 ते 15 ग्रॅम प्रथिने युक्त आहार, गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांना 600 उष्मांक व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच तीव्र कमी वजनाच्या बालकांना 800 उष्मांक व 20 ते 25 ग्रॅम प्रथिने युक्त THR आहार दिला जातो. तसेच 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रात सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण महिला बचत गटामार्फत गरम ताजा आहार देण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पाककृती देण्यात येतात.