लाभार्थी
- 15-49 वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलीं
- 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलां मधिल
वर्णन
केंद्र शासनाच्या मान्यतेने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये पोषण अभियानाची देशातील सर्व राज्यांमध्ये सन 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. मा.पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यानुसार शासनाने दि. 11/7/2018 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 36 जिल्हयातील 553 प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये सुरु आहे.
पोषण अभियान हा ०-६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये सन 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. मा.पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मार्च 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला, हा कार्यक्रम किशोरवयीन मुली आणि गर्भवती स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील वाढ, कुपोषण, अशक्तपणा आणि जन्मतः कमी वजन, या सर्व बाबी कमी करण्यासाठी तंत्रज्ञान, लक्ष्यित दृष्टिकोन आणि अभिसरण वापरतो. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण आणि हस्तक्षेप सुनिश्चित करणे, अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष्य साध्य करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 11/7/2018 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 36 जिल्हयातील 553 प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये सुरु आहे.
पोषण अभियानाची उद्दिष्टे
उदिदष्टे |
ध्येय |
0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलां मधिल बुटकेपणा कमी करणे |
प्रति वर्ष 2% नुसार आगामी तीन वर्षात 6% कमी करणे. |
0 ते 6 वर्ष वयोगटातील आहारातील पोषण मुल्यांच्या कमतरेमुळे कमी होणारे वजन कमी करणे व थांबविणे. |
प्रति वर्ष 2% नुसार आगामी तीन वर्षात 6% कमी करणे. |
6-59 महिने वयोगटातील मुलांमधिल अनिमियाचे प्रमाण कमी करणे |
प्रति वर्ष 3% नुसार आगामी तीन वर्षात 9% कमी करणे. |
5-49 वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलीं मधिल अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे. |
1 प्रति वर्ष 3% नुसार आगामी तीन वर्षात 9% कमी करणे. |
जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनाचे प्रमाण कमी करणे |
प्रति वर्ष 2% नुसार आगामी तीन वर्षात 6% कमी करणे. |
योजनेचे स्वरुप
वरीलप्रमुख उद्दिष्टांनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोषण अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत असुन त्यामध्ये ग्राम विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जिवन उन्नती अभियान (MSRLM), अन्न-पोषाहार बोर्ड, शिक्षण विभाग व महिला बाल विकास विभाग, यांच्या अभिसरणाद्वारे पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
पोषण अभियानात प्रत्येक स्त्री आणि मुलाच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते. विशेषतः मुलाच्या आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसांमध्ये, अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते. जनआंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला गुंतवून ठेवणे समुदायात जनजागृती निर्माण केली जाती.
निकष / कार्यप्रणाली
पोषण अभियान अंतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी सन 2019-20 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे