वर्णन
योजनेची उद्दिष्टे:
• 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
• मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासाचा पाया घालणे.
• बालमृत्युचे,बालरोगाचे, कुपोषणाचे आणि मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
• बालविकासास चालना मिळावी म्हणून विविध विभागांमध्ये धोरण व
• अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
• योग्य अशा पोषण व आहार विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य
• व त्यांच्या पोषण विषयी गरजांकडे लक्ष पुरविण्याविषयीची मातांची क्षमता वाढविणे.
केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षाच्या आतील मुले, गरोदर स्त्रीया तसेच स्तनदा माता व 15 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ स्त्रिया, किशोरी मुलींना विविध सुविधा व सेवा पुरविण्यात येतात.
पूरक आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, वैद्यकीय संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण आणि औपचारिक शिक्षण हे योजनेचे घटक आहेत.
• महाराष्ट्र राज्यात 553 प्रकल्प मंजूर असून त्यात 364 ग्रामीण, 104 शहरी व 85 आदिवासी
• एकात्मिक बाल विकास प्रकल्पांत जवळपास 125-200 अंगणवाडी केंद्रांचा समावेश असतो.
• साधारणपणे ग्रामीण व नागरी क्षेत्रात किमान 400 ते 800 लोकसंख्येसाठी 1 अंगणवाडी केंद्र तसेच 150-400 लोकसंख्येसाठी 1 मिनी अंगणवाडी केंद्र तसेच आदिवासी क्षेत्रात 300 ते 800 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी केंद्र व 150-300 लोकसंख्येसाठी 1 मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी सेविका आणि मदतनिस असते.साधारणत: 25 अंगणवाडयांसाठी एक पर्यवेक्षिका असते. अंगणवाडयांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे हे त्यांचे काम असते.
तपशील
आय सी डी एस हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आले.
• आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरव इच्छिते.
• लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा
विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
• आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वॉर्डात सर्व पायाभूत, आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी
झोपड्यांमधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्प्याटप्प्याने विस्तारली आहे.
• राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण,
८५ आदिवासी विभागात आण १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.
• या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा :
o पूरक पोषण आहार
o लसीकरण
o आरोग्य तपासणी
o संदर्भ आरोग्य सेवा
o अनौपचारीक शालापूर्व शिक्षण
o पोषण आणि आरोग्य शिक्षण