महिला व बालकांना समुपदेशन सेवा उपलब्ध करुन दयाव्यात त्यांच्याबाबतीत घडणा-या अत्याचारास आळा बसावा या हेतूने राज्यात महिला समुपदेशन केंद्रे पोलीस स्टेशनच्या आवारात सुरु करण्यात आलेली आहेत. सदर प्रत्येक समुपदेशन केंद्रात दोन प्रशिक्षित समुपदेशक नेमण्यात आलेले असून त्यांना ठराविक दराने मानधन देण्यात येते.
समुपदेशन केंद्र योजना राबविण्यासाठी समुपदेशन केंद्र स्थापन करण्या-या संस्थेस वार्षीक अनुदान देण्यात येते. राज्यात सध्या जिल्हास्तरावर 39 तर तालुका स्तरावर 97 समुपदेशन केंद्राना (एकूण १४६) मान्यता दिली आहे. यापैकी १२९ समुपदेशन केंद्र सध्या कार्यरत आहेत.