लाभार्थी
अनुसूचित क्षेत्रार्गत अंगणवाडी / मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा माता व वय वर्ष 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके
वर्णन
सदर योजना राज्यातील 16 जिल्हयातील 111 प्रकल्पातील 14322 अंगणवाडयांमार्फत राबविण्यात येते.या योजनेंतर्गत या क्षेत्रातील टप्पा 1 अंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना दररोज रु. 45/- या खर्च मर्यादेत एक वेळ पुर्ण जेवण दिले जाते. टप्पा 2 अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवडयातील 4 दिवस रु. 6/- किंमतीच्या मर्यादेत केळी / अंडी देण्यात येते
योजनेची उद्दीष्टे
- अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे.
- कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे
- कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे
- स्त्रियांमधील ऍनिमियाचे प्रमाण कमी करणे.
योजनेचे स्वरुप
- गरोदर व स्तनदा मातेस महिन्यातून 25 दिवस चौरस आहार दिला जातो. यासाठी प्रति लाभार्थी प्रति दिवस रु 45/- याप्रमाणे खर्च करण्यात येतो. (शासन निर्णय क्र.आविवि-0523/प्र.क्र.104/का-08 ) , दिनांक 10 जुलै 2023 ) यापूर्वी प्रति लाभार्थी प्रति दिवस रु.35/- याप्रमाणे खर्च करण्यात येत होता.
- 7 महिने ते 6 वर्ष वयाच्या बालकांना महिन्यातील 16 दिवस 1 अंडी (मांसाहारी मुलांकरिता) किंवा 2 केळी (शाकाहारी ) मुलांकरिता ऋतुमानानुसार फळ दिले जाते. यासाठी प्रति लाभार्थी प्रति दिवस रु 6/- याप्रमाणे खर्च करण्यात येतो.
- स्थानिक महिला मंडळ बचत गट / अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत योजनेच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना अन्न शिजवून देण्यात येते.
- आहार समितीच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे रक्कम जमा केली जाते.
निकष / कार्यप्रणाली
अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी सेविका व आशा यांनी लक्ष्य गटामधून अंगणवाडी / मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मतांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करण्यात येईल.