लाभार्थी
बेबी केअर किट ही योजना महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/ शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्याठिकाणी प्रसुती होण्या-या महिलांना पहिल्या प्रसुतीच्यावेळी त्यांच्या नवजात बालके करिता (मुलगा किंवा मुलगी) कार्यरत आहे.
वर्णन
शासन निर्णय क्र. एबावि-2018/प्र.क्र.151/का-6 दि. 29 डिसेंबर, 2018 नुसार बेबी केअर किट योजना लागू करण्यात आली, त्यानुसार महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/ शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्याठिकाणी प्रसुती होणाऱ्या नवजात बालकांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्यांना मोफत शासनातर्फे रुपये 2000/- इतक्या रक्कमेपर्यंत बेबी केअर कीट बॅग उपलब्ध करुन देणेस मान्यता दिलेली आहे.
योजनेची उद्दीष्टे
- शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/शासकीय रुग्णालयात प्रसूतीस प्रोत्साहन देणे
- बाल मृत्यू दर कमी करणे
- गरोदर मातेच्या आरोग्याच्या काळजी घेणे
योजनेचे स्वरुप
प्रत्येक बेबी केअर किटमध्ये (1) लहान मुलांचे कपडे (2) प्लास्टीक लंगोट (3) लहान मुलांची झोपण्याची लहान गादी (4) लहान मुलांचे टॉवेल (5) ताप मापन यंत्र इलेक्टॉनिक्स थर्मामिटर (6) लहान मुलांना अंगाला लावावयाचे तेल- 250 मि.ली. (7) मच्छरदाणी (8) लहान मुलांसाठी गरम ब्लँकेट (9) लहान चटई प्लास्टीक (10) लहान मुलांचा शॅम्पो- 60 मि.ली.(11) लहान मुलांची खेळणी- खुळखुळा (12) लहान मुलांची नखे काढण्यासाठी नेलकटर (13) लहान मुलांसाठी हातमोजे व पायमोजे (14) लहान मुलांच्या आईसाठी हात धुण्याचे लिक्विड (15) लहान मुलाला बांधुन ठेवण्यासाठी कापड/ आईसाठी लोकरीचे कापड (16) लहान मुलांसाठी बॉडी वॉश लिक्वीड (17) सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग इ. साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
निकष / कार्यप्रणाली
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या महिलेने गरोदरपणी 9 व्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेला माहिती/ अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून संबधित लाभार्थ्यांना बेबी केअर कीट बँग उपलब्ध करुन देण्यात येते.