मुंबई अपराधी परिविक्षा अधिनियम 1938 व 1940 नूसार योजनेस सुरवात झाली. केंद्र शासनाचा अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 व महाराष्ट्र अपराधी परिविक्षा नियम 1966 नूसार कार्यवाही कार्यरत आहे.
सामाजिक परिस्थितीच्या दबावामुळे किंवा काही विशिष्ट परिस्थितीत एखादया व्यक्तीकडून एखादा गुन्हा घडला व त्या बद्दल त्याला पश्चाताप होत असेल तर चांगले जीवन जगण्याची संधी समाजाने त्याला दिली पाहिजे. अशा प्रकारची संधी न्यायालयाने अपराध्यास दिली असता, त्याच्या मानसिक प्रवृत्तीत बदल घडवून आणणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्याची दुष्कृत्ये विधायक (constructive) बनवून चांगल्या गुणांना वाव देऊन, त्याच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी स्वत:च्या सहकार्याने त्यास समाजाचा उपयुक्त घटक बनविणे.