राज्य गृह व आधारगृहाचे लाभार्थी:
निराधार,16 ते 60 वर्ष वयापर्यंतच्या निराधार,निराश्रित,परित्यक्ता, कुमारीमाता, संकटग्रस्त व अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय संरक्षण व मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे नोकरी , व्यवसाय आणि विवाह या व्दारे पुनर्वसन करण्यात येते गरजू महिला स्वेच्छेने वसतीगृहात प्रवेश घेवून दोन ते तीन वर्ष राहू शकतात.
संरक्षण गृहाचे लाभार्थी:
अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात येऊन न्यायालयाच्या आदेशाने त्यांना संरक्षण गृह मध्ये दाखल करण्यात येते.
वर नमूद वासतिगृहांमधे लाभाrt खालील प्रमाणे माहेर योजनेचा लाभ दिला जातो
महिलेला दरमहा रू.१०००/- तिचेवर अवलंबून असलेल्या पहिल्या बालकास रूपये ५००/- व दुसरे बालकास रूपये ४०० /- अनुदान देण्यात येते.
प्रति महिला प्रतिमहा रूपये ९५०/- सहाय्य अनुदान स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या ६ आधार गृहांना देण्यात येते.