लाभार्थी
बालक
वर्णन
• 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बालविकास, महाराष्ट्र शासनार्फे सर्वप्रथम 'माझी कन्या भाग्यश्री' योजनची अमलबजावणी सुरु झाली आहे.
• या योजन अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल • या योजनची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाण आहेत
एक मलगी: 18 वर्ष कालावधीसाठी रु. 50,000
दोन मुली : प्रत्येक मुलीच्या नावे 25 हजार रुपये
7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुचुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ प्रत्येक सहा वर्षांनतर कुटुंब जमा व्याज काढून घऊ शकते
मुदत ठेवीच्या निर्मितीसाठी रु. 20 कोटी (आर्थिक वर्ष 2017-18) आणि रु. 14 कोटी रुपये (वित्तीय वर्ष 2018-19) वितरीत करण्यात आले आहेत 14 कोटी रुपये (वित्तीय वर्ष 2018-19) वितरित करण्यात आले आहेत.
योजनेची उद्दीष्टे
1. लिंग निवडीस प्रतिबंध करणे
2. बालिकांचा जन्मदर वाढवणे
3. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
4. बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरीता समाजात कायमस्वरूपी सामाजिक चळवळ निमार्ण करण
5. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
6. सामाजिक बदलाचे प्रमख घटक म्हणून पंचायत राजसंस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळ, महिला बचतगट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.
7. जिल्हा, तालुका, व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे.
तपशील
दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी कुटूंबातील सुकन्या योजना दि.1-१-2014 पासून लागू करण्यात आली होती. शासनाने दि.26-2-2016 च्या शासन निर्णयानुसार सदर योजना विलीन करुन माझी कन्या भाग्यश्री ही योजना दि.1-4-2016 पासून लागू करण्यात आली आहे.
सदर योजना राबविण्याच्या दृष्टिने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक दि.२२-२-२०१७ अन्वये निर्गमित केलेल्या आहेत. सदर शासन सुचनानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.)
आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी/ग्रामीण) सर्व यांनी प्राधान्याने करावयाची आहे.
योजनेच्या अटी
जिल्हयातील दि.१-४-२०१६ पासून APL आणि BPL कुटूंबातील जन्म झालेल्या कुटूंबातील पहिल्या \दोन मुली अपत्यांची माहिती संकलीत करणे. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. शासन परिपत्रकासोबत जोडण्यात आलेल्या परिपत्रकातील सुचनानुसार या योजनेसाठी आवश्यक असलेले अर्ज पप्रत अ किंवा ब (जे लागू असतील) अर्जाच्या प्रती अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प (ग्रामीण आणि शहरी) कार्यालय आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन द्यावेत.
योजनेचे स्वरुप
(१) कुटूंबात पहिले आपत्य मुलगी असताना दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास तिच्या जन्माच्या स्वागतासाठी पालकांच्या बँक खात्यात रु.2,500/- रक्कम वर्ग करणे.
(२) एकुलत्या एक मुलीच्या जन्मानंतर आजी आजोबा यांना प्रात्साहनपर भेट म्हणून सोन्याचे नाणे रु.5,000/- पर्यंत प्रमाणपत्र भेट म्हणून द्यावयाचे आहे.
(३) एकुलत्या एक मुलीच्या ५ वर्ष वयापर्यंत प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी किंवा वर्षाच्या शेवटी दर्जेदार पोषण देण्यासाठी प्रतिवर्ष रु.2,000/- प्रमाणे पाच वर्षाकरिता रु.10,000/- कुटूंबास अदा करावयाचे आहे.
(४) दोन मुलींच्या वयाच्या पाच वर्ष वयापर्यंत प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी किंवा वर्षाच्या शेवटी दर्जेदार पोषण देण्यासाठी प्रतिवर्ष प्रति लाभार्थी रु.1,000/- प्रमाणे पाच वर्षाकरिता रु.10,000/- कुटूंबास अदा करावयाची आहे.
(५) एकुलत्या एक मुलीच्या प्राथमिक शाळेचा टप्पा (१ ली ते 5वी ) दर्जेदार पोषण आहार व शालेय संकिर्ण खर्चाकरिता रु.2,500/- प्रतिवर्ष प्रमाणे पाच वर्षाकरिता रु.12,500/- कुटूंबास अदा करावयाचे आहे.
(६) दोन मुलीच्या प्राथमिक शाळेचा टप्पा (१ ली ते 5वी ) दर्जेदार पोषण आहार व शालेय संकीर्ण खर्चाकरीता रु.1,500/- प्रतिवर्ष प्रति लाभार्थी या प्रमाणे पाच वर्षाकरिता रु.15,000/- कुटूंबास आदा करावयाचे आहे. एकुलत्या एक मुलीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचा टप्पा ( 6वी ते 12वी ) दर्जेदार पोषण आहार व शालेय संकिर्ण खर्चाकरिता रु.3,000/- प्रतिवर्ष प्रमाणे ७ वर्षाकरिता रु.21,000/- कुटुंबास अदा करावयाचे आहे.
(७) दोन मुलीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचा टप्पा ( 6वी ते 12वी ) दर्जेदार पोषण आहार व शालेय संकिर्ण खर्चाकरिता रु.2,000/- प्रतिवर्ष प्रति लाभार्थी प्रमाणे ७ वर्षाकरिता रु.28,000/- कुटुंबास आदा करावयाचे आहे.
(८) APL कुटुंबात जन्माला येणाऱ्या एकुलत्या एक मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास सोन्याचे नाने (रु.5,000/- कमाल मर्यादेपर्यंत) देण्यात यावे.
(९) ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुलीचे दरहजारी प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीस रु.5,00,000/- एवढे पारितोषिक कार्यप्रणाली
आवश्यक कागदपत्रे
• अर्जदाराचे आधारकार्ड
• आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
• निवास प्रमाणपत्र
• उत्पन्न प्रमाणपत्र
• मोबाईल नंबर
• पासपोर्ट आकाराचा फोटो
कार्यप्रणाली
अ) सदर योजनेंतर्गत, लाभासाठी मुलीच्या पालकांनी , मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये (जे लागू असेल ते ) अर्ज सादर करावा. अर्जा सोबत उपरोक्त अटी व शर्तीनुसार नमूद दस्तऐवज सादर करण्यात यावेत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास ) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधीत लाभार्थ्याकडून अर्ज भरुन घ्यावा (गरजे प्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी.) आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
(ब)अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी / तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी. महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा परिषद ) यांनी योग्य ती छाननी करुन यादी समान्यता देऊन बँकेत सादर करावी. बालगृह / शिशुगृह किंवा महिला व बाल विकास विभागातंर्गतच्या इतर निवासी संस्था मधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्या आधी संबंधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थांनी प्राप्त करुन घेऊन अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
(क) संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे यादच्छिक पध्दतीने (Randomly) जास्त संख्या असलेल्या एखाद्या वस्तीची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. तद्नंतर एक महिन्याच्या कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पात्र लाभार्थ्याचे अर्ज बँक आँफ महाराष्ट्र शाखेकडे, लाभार्थ्याला रुपये 50,000/- किंवा रुपये 25,000/- पात्रतेनुसार एवढया रक्कमेची मुदत ठेव सर्टीफिकेट मिळण्यासाठी सादर करतील. बँकेकडून मिळालेले प्रमाणपत्र बाल विकास प्रकल्प अधिकारी / महिला बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत संबंधीत लाभार्थ्याच्या पालकांना उपलब्ध करुन देतील.
(ड) अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरुन दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी मुलीच्या जन्मानंतर एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाच्या बाबतीत 1 वर्षाच्या आत व दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाच्या बाबतीत 6 महिन्याच्या आंत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडून सादर केलेले अर्ज स्वीकारावेत. अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केला नसल्यास, अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्जदारास लेखी कळवावे. अर्जदारांनी अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यकती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जादारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. अन्यथा संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.