परिचय
महिला व बाल विकास विभाग हे बाळाचे जीवन, सुरक्षा, विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बाल संरक्षण आणि पुनर्वसन सेवेंतर्गत विभागाने राज्यात बाल संगोपन संस्थांची (सीसीआई) एक साखळी निर्माण केली आहे. ज्यामध्ये बालगृह, संगोपन केंद्र आणि निरीक्षण गृह आणि विशेष गृह इत्यादी सेवा आहेत. सीसीआय मध्ये राहणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी विभाग कार्यरत असतो. विभागाची बालकांच्या विकासकार्यातील काही महत्वाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित बालकांची काळजी घेणे आणि त्यांना संरक्षण देणे
- अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे
- निराधार, अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
- बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे
- बालविवाहांना प्रतिबंध करणे आणि बालक तस्करीला प्रतिबंध करणे
- बाल हक्क आणि न्यायाविषयी समाजात जाणीव जागृती करणे
मिशन वात्सल्य अंतर्गत योजना
Sr.No | Schemes |
---|---|
1 | गव्हर्नमेंट चिल्ड्रेन्स होम |
2 | Specialized Adoption Agencies (SAA) |
3 | उघडे निवारा (Open Shelters) |
4 | विशेष गृह (Special Homes ) |
5 | निरीक्षण गृह |
6 | वात्सल्य सदन |
7 | सुरक्षिततेचे ठिकाण (Place of Safety) |